खरीप हंगाम 2022 करिता 724 कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर | 2022 Kharip Pik Vima

Kharip Pik Vima Manjur प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासन निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय

भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम 2022 करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *