50 हजार अनुदान दुसरी यादी | 50 Hajar Anudan Second List

50000 anudan 2nd List: – कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांना प्रतीक्षा होती ती दुसर्‍या यादीची. तर पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती,  १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ही यादी जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी केवायसी केली होती, त्यांच्या बँक खात्यात दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी ५० हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जमा सुद्धा करण्यात आले. अखेर 50 हजार रूपये अनुदानाची दुसरी यादी आलेली आहे.

50000 अनुदान यादी कुठे पहावी ?

5000 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी (50000 anudan 2nd list) ही सीएससी सेंटर वर पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार क्रमांक घेऊन आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवरच जाऊन ही यादी पहावी लागणार आहे. इतर जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहता येणार नाही.

यादीत तुमचे नाव असेल तर लवकर करा हे काम, तरच मिळेल अनुदान

शेतकरी मित्रांनो, ५० हजार रुपये अनुदानाच्या दुसर्‍या यादीत (50000 anudan 2nd list) तुमचे नाव आले असेल, तर तुम्हाला लगेच आधार क्रमांकाच्या साहाय्याने तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *