Agriculture Crop Insurance: या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३ हजार ६०० रुपये शासन निर्णय पहा राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे, तसेच या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.