वाढीव अतिवृष्टी मदत या ५ जिल्ह्यांसाठी मदत मंजूरी | Ativrushti Nuksan Bharpai 2021

माहे मार्च, एप्रिल, मे, २०२१ या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसामुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत.

प्रस्तावना :

माहे मार्च, एप्रिल व मे, २०२१ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात यावे व त्यानुसार त्यांना मदत देण्यात यावी असाही निर्णय दिनांक १२ मे, २०२१ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार बाधित क्षेत्रासाठी मदत देण्याकरीता रू. १२२२६.३० लक्ष निधी संबंधित विभागीय आयुक्तांना संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे. तद्नंतर विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून दि.२२.०५.२०२१ ते दि.३१.०५.२०२१ या कालावधीतील शेतीपिकांच्या नुकसानीकरिता प्रस्ताव प्राप्त झाला. मार्च ते मे, २०२१ या कालावधीतील अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंत्रीमंडळ उपसमितीने यापूर्वीच मंजूरी दिलेली आहे.

२. त्यानुसार विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मागणी केल्यानुसार रू.८५७.५० लक्ष (रूपये आठ कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः  संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

माहे मार्च, एप्रिल व मे, २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे नाशिक, या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपीकांचे/पळपिकांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF)/राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या शासन मान्यतेनुसार, विभागीय आयुक्त नाशिक यांना खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार रू.८५७.५० लक्ष (रूपये आठ कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

One thought on “वाढीव अतिवृष्टी मदत या ५ जिल्ह्यांसाठी मदत मंजूरी | Ativrushti Nuksan Bharpai 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये