ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत
प्रस्तावना:
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण, औरंगाबाद, नाशिक व नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संदर्भाधीन क्र.४ च्या शासन निर्णयान्वये तुर्ततास ७५% इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मागणी केल्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, नाशिक व जळगाव यांना जिरायत सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करावयाच्या निधीपैकी संदर्भाधीन क्र.४ च्या शासन निर्णयांन्वये वितरीत करण्यात आलेला निधी वजा जाता उर्वरित देय असलेला निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ativrushti nuksan bharpai 2021, धुळे नुकसान भरपाई यादी 2021.
शासन निर्णयः संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५% एवढा असा एकूण रु ४३५२.९२ लाख ( अक्षरी रुपये त्रेचाळी कोटी बाव्वन लाख ब्यान्नव हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. नंदुरबार नुकसान भरपाई यादी 2021
त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, नाशिक व जळगाव यांना जिरायत सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करावयाच्या निधीपैकी संदर्भाधीन क्र.४ च्या शासन निर्णयांन्वये वितरीत करण्यात आलेला निधी वजा जाता खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार रू.८२४१.८२ लाख (अक्षरी रूपये ब्याऐंशी कोटी एकेचाळीस लाख ब्याऐंशी हजार फक्त) एवढा निधी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. अहमदनगर नुकसान भरपाई यादी 2021
वरीलप्रमाणे व या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.
उक्त निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. संदर्भाधीन क्रमांक २ येथील दिनांक २१.१०.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) संदर्भाधीन क्रमांक १ व ३ येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेला निधीतून भागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. चालू खरीप हंगामाकरिता एकाच क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीकरिता मदतीची ब्दिरूक्ती होणार नाही याची सर्व जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक
खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
Krushna Bodkhe yanni sangitle namaskar aahe ka he