अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 साठी 365 कोटी निधी वितरित 22 जिल्ह्यांची यादी आली | Ativrushti Pik Nuksan Bharpai 2021

जुलै 2021 मध्ये अतिवृष्टी नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 365 कोटी रुपये वितरित केल्या जाणार आहे. जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानी करिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत.

हे पण वाचा : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे आला पहा मोबाइलला वर

प्रस्तावना:

जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेलया पुररिस्थितीमुळे राज्यातील काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत दिनांक ०३.०८.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार  शासन निर्णयान्वये मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात आले नव्हते. दि.२२.०९.२०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021

 • या यादीमध्ये औरंगाबाद विभागात मधील : जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 • नागपूर विभागामधील: नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे
 • अमरावती विभागामधील: बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ  या जिल्ह्यांचा समावेश आहे
 • पुणे विभागांमधील: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 • नाशिक विभागामधील: नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 • कोकण विभागामधील: ठाणे, पालघर, रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शासन निर्णयः

 1. जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्यानुसार एकूण रु. ३६५६७.०० लाख (अक्षरी रुपये तीनशे पासष्ट कोटी सदुसष्ट लाख फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
 2. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.
 3. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्यात यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च करण्यात येणाऱ्या निधीची माहिती केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विकसित केलेल्या NDMIS या प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावी. सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
 4. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

14 thoughts on “अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 साठी 365 कोटी निधी वितरित 22 जिल्ह्यांची यादी आली | Ativrushti Pik Nuksan Bharpai 2021”

 1. मी, अल्पभूधारक शेतकरी आहे. आणि जुलै-आक्टोबर 2021 च्या अतिवृष्टिने खूप पिक नुकसान झाले आहे. करीता मौजा पिंपळगांव निपाणी, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती महाराष्ट्र ची लाभार्थी यादी पाहिजे.

  Reply
 2. अमरावती नांदगाव खंडेश्वर पिंपळगाव निपाणी येथील 2021 पिक नुकसान लाभार्थी यादी पाहिजे.

  Reply
 3. जिल्हा-अमरावती ची तालुका आणि गाव वरी पिक नुकसान 2021ची लाभार्थी यादी.

  Reply
 4. वाशिम तालुका मनोरा पोस्ट वारोली येथिल शेतकरी असून अतिरूठी मुल्हे शेतीचे मोठे नुकसान झाले असुन सरकारच्य लिस्ट मधे नाव नाही

  Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये