शासनाने ज्याप्रमाणे सातबारा आणि नमुना ८-अ ऑनलाईन नकाशा देण्यास सुरूवात केलेली आहे. त्याच प्रमाणेच आता शासनाने शेत जमिनीचाहि ऑनलाईन नकाशा देण्यास सुरूवात केलेली आहे. bhunakasha यावर तुम्ही कुठलाही Survey No, Total Area, Pot kharaba, Owner Name, खाता नंबर पाहू शकता तेही एका मिनट मद्धे.
जर तुम्हाला तुमच्या शेताच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील किंवा आपल्या शेतातून रस्ता काढायचा असल्यास त्याचा तुमच्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे महत्वाचा आहे.
तर ते नकाशे आता तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरच काढू शकता आणि पाहू शकता . याला ई- नकाशा प्रणाली असे म्हणतात.
तर ते नकाशे आपल्या मोबाईल वर कशे काढायचे ते आपण पहाणार आहो, पण त्यासाठी कृपया आधी हा लेख पूर्ण वाचून घ्यावा
Step 1: सर्वात आधी तुमच्या मोबाईलचा ब्राउजर वर जाऊन तुम्हाला भु नकाशा महाराष्ट्र bhunaksha maharashtra असे टाईप करायचे आहे किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.
Link: https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
Step 2: वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला येथे नकाशा ओपन होणार तुम्हाला जर सॅटॅलाइट इमेज बघायची असेल तर वरील तीन पट्ट्यांवर क्लिक करून तुम्ही जिओ रेफरन्स मॅप georeferenced map वर क्लिक करून तुम्ही सॅटॅलाइट इमेज पाहू शकता किंवा नॉर्मल इमेज सुद्धा तुम्ही पाहू शकता.
Step 3: यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणचा नकाशा पाहायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य तुमची कॅटेगरी तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायच आहे निवडलेले ठिकाण इंटर केल्यावर तुम्हाला येथे तुमच्या सोयीनुसार सर्व नकाशे पाहायला मिळतील.
Step 4: तुम्ही नकाशा वर क्लिक केल्यानंतर त्या नकाशा चे पूर्ण डिटेल तुम्हाला मिळणार मालकाचे नाव त्याचे क्षेत्र आणि इतरही माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळतात,
तर मित्रांनो हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
require Jamin Nakasha with dimensions
many village names are not displayed