भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या पोर्टलवर आतापर्यंत देशभरातील 25 कोटींहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे, परंतु हे पोर्टल नेमके काय आहे? या पोर्टलवर जाऊन ई-लेबर कार्ड कसे मिळवायचे? आणि आता आपण त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
ई-लेबर कार्ड आधारशी जोडलेले आहे. याद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कामगारांना अपघात विमा संरक्षण प्रदान केले जाईल. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ उपलब्ध आहे.