पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु.१८० कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन २०२१-२२ साठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्र.४ अन्वये सादर केली आहे. सबब, आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु. १८० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय : पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रु. १८० कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम २०२१-२२ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.