पीक विम्यासाठी १७ कोटी ७७ लाख वितरीत | फळपीक विमा 2021 | Falpik Vima Yadi 2022

fal pik vima पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२१ साठी राज्य हिस्साची रु. १७,७७,३९,६८२/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत. मृगबहार फळ पीक विमा योजना.

प्रस्तावना : महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२ , २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) (मृग बहार) या ८ फळपिकांसाठी २६ जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स.कं.लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स.कं.लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. Fal pik vima yojana 2021

GR शासन निर्णय PDF: लिंक येथे क्लिक करा

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सन २०२१ मृग बहारासाठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्र.४ अन्वये सादर केली आहे. त्यास अनुसरून कृषि आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार रु.१७,७७,३९,६८२/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. crop insurance scheme Maharashtra

शासन निर्णय : पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२१ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रु.१७,७७,३९,६८२/- (रूपये सतरा कोटी सत्तातर लक्ष एकोणचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी फक्त) इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. dalimb vima, mosambi vima, Jalna mosambi vima, aurangabad mosambi vima, Solapur dalimb vima

1 thought on “पीक विम्यासाठी १७ कोटी ७७ लाख वितरीत | फळपीक विमा 2021 | Falpik Vima Yadi 2022”

  1. रामदास आसाराम हांडके जिल्हा जालना तालुका भोकरदन आज पर्यंत कोणताही लाभ घेतलेला नाही

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये