आता फक्त एक मिस कॉल देऊन कसा बुक करायचा LPG गॅस सिलेंडर लवकर जाणून घ्या – एकदम सोपी प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो इंडियन ऑईलकडून आता आपल्या LPG ग्राहकांसाठी एकदम नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मध्ये ग्राहकांना फक्त एक मिस कॉल देऊन LPG गॅस सिलेंडर बुक करता येईल.

गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून भुवनेश्वर येथील कार्यक्रमात ‘मिस कॉल’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. gas booking by call

आणि महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. आताचं इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम म्हणजे सध्याच्या आईवीआरएस कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. पण नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

या मिस कॉल सुविधे चा वापर कसा कराल
या मिस कॉल सुविधेसाठी आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागणार आहे . गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलिंडर बुक झाल्याचा मेसेजे येईल.सिलिंडरची डिलेव्हरी एका दिवसात कशी होईल, याला प्राधान्य द्या, अशी सूचना धर्मेंद्र प्रधान यांनी कार्यक्रमात केली. 2014 पर्यंत देशभरात फक्त 13 कोटी गॅस कनेक्शन्स होती. मात्र, गेल्या सहा वर्षांमध्ये हा आकडा 30 कोटीपर्यंत पोहोचल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये