आपल्या आधार कार्ड Aadhaar Card ला नेमका कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला आहे जाणून घ्या

आपल्या  देशात आधार कार्ड Aadhaar Card हे खूप  महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. बऱ्याच  महत्त्वाच्या कामांसाठी त्याचा वापर केला जातो. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.

पण आजकाल बहुतेक लोकांकडे  एकापेक्षा अधिक नंबर असल्याने ते नेमका कोणता नंबर आधार कार्डला लिंक केला आहे, हे लक्ष राहत नाही. पण जर तुम्हांला मोबाईल नंबर ठाऊक असेल तर अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल वर अनेक अपडेट्स करता येऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ते पटकन कसं चेक कराल हेच या पोस्ट मध्ये आपण पहाणार आहो.

UIDAI म्हणजे आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट वर आता अनेक गोष्टी सहज पाहण्याची, अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हांला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे ते सुद्धा पाहण्याची सुविधा आहे.

आधार कार्ड Aadhaar Card ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे कसे पहाल?

Step 1: सर्वप्रथम uidai.gov.in या आधारकार्ड च्या  या UIDAI वेबसाईट वर जा. किवा दिलेल्या लिंक वर सुद्धा तुम्ही क्लीक करू शकता.

Step 2: या वेबसाईट वरील verify the Aadhaar card services such as email and mobile number या ऑप्शन वर  क्लिक करा.

Step 3: त्यानंतर तुम्हांला विचारलेली माहिती भरा.

Step 4: तुमचा मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी कोड इंटर करा.

Step 5: त्यानंतर तेथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका.

Step 6: तुमच्या इमेलवर एक OTP पाठवला जाईल.

तुमच्इया मेल वर आलेला OTP  येथे टाकल्यानंतर तुमच्या आधारकार्डाची सर्व  माहिती येथे  पहायला मिळेल. यामध्ये तुमचा मोबाईल कोणता आहे ते पण दिसणार.

त्यामुळे आता तुमच्या आधार कार्डवर कोणता मोबाईल दिला होता होता? हे तुम्ही आता  घरबसल्या काही मिनिटात पाहू शकता.

Leave a Comment