- तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्र/आधार कार्ड केंद्राला भेट द्या. uidai.gov.in वर “लॉकेट एनरोलमेंट सेंटर” वर क्लिक करून तुम्ही जवळचे आधार केंद्र तपासू शकता.
- मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार हेल्प एक्झिक्युटिव्ह तुम्हाला भरण्यासाठी एक फॉर्म देईल. आधार अपडेट/सुधारणा फॉर्म भरा.
- तुमचा फॉर्म पुन्हा तपासा आणि आधार एक्झिक्युटिव्हकडे सबमिट करा.
- अपडेटसाठी तुम्हाला किमान 50 रुपये सेवा शुल्क आकारले जाईल. आधार एक्झिक्युटिव्हला फी भरा.
- व्यवहारानंतर, आधार एक्झिक्युटिव्ह अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असलेली पावती स्लिप देईल.
- तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही दिलेला URN वापरू शकता.
- स्टेटस तपासण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या आणि चेक एनरोलमेंट आणि अपडेट स्टेटस वर क्लिक करा. तुमचा URN नंबर आणि कॅप्चा एंटर करा.
- विशेष म्हणजे, तुमचा मोबाईल नंबर ९० दिवसांच्या आत UIDAI डेटाबेसमध्ये अपडेट केला जाईल.