पिक विमा 2020-21 निधी आला नवीन शासन निर्णय जी आर बघा | kharip pik vima 2020-21

नमस्कार मित्रांनो आज खरीप पिक विमा २०२१ चा एक छोटासा अपडेट आला आहे. शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाचा GR आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 973 कोटी निधिचा GR आला आहे. राज्य शासनातर्फे पिक विमा कंपनीस निधि मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे.

हे पण वाचा : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे आला पहा मोबाइलला वर

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२१ साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. ९७३,१६,४७,७५८/इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

प्रस्तावना :

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ kharip pik vima 2020-21 पासून तीन वर्षाकरीता दि.२९.०६.२०२० व दि. १७.०७.२०२० च्या शासन निर्णयान्वये

या कंपन्यांना मिळणार kharip pik vima 2020-21 चा निधी

 1. भारतीय कृषि विमा कंपनी
 2. इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि.
 3. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.
 4. भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि.
 5. बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि.
 6. एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि

या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ kharip pik vima 2020-21 अंतर्गत उपरोक्त ६ कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील “चालु हंगामातील नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरीदेखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीम स्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकुण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५० टक्के रक्कम आगाऊ स्वरुपात कंपन्यांना द्यावी” असे नमूद आहे. त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने  पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून रु. ९७३,१६,४७,७५८/- इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी रु. ९७३,१६,४७,७५८/- इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम २०२१ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

13 thoughts on “पिक विमा 2020-21 निधी आला नवीन शासन निर्णय जी आर बघा | kharip pik vima 2020-21”

 1. 2020-21 चा खरिप पिक विमा ज्या शेतकरयांना मिळाला नव्हता त्यांना कधी मिळणार?

  Reply
 2. Kadi vatap honar ahe jalgaon taluka chi asun pan magachya 2020 che and 2021 asun ek rupaya pan milalA nai kapus soyabeen che magachya year che and aata che kapus che

  Reply
 3. नुकसान भरपाई नाही आणि पिक विमा पण नाही. नुसत्या बातम्या येतात मंजूर झाला मंजूर झाला. पण वाटप कधी होणार?

  Reply
 4. पिक विमा नसुन शेककऱ्याची लुबाडणुक आहे कि ५ हेक्टर चा विमा भरला त्यामध्ये २ हेक्टर उळीद पूर्ण १०० % नुकसान सोयाबीन २ हेक्टरअती रुष्टी मुळे सोयाबीन ७०% ते८० % च्या नुकसान झाल मुग १ हेक्टर पुर्ण खराब झाला विमा भरला ४७३५ रु मला नुकसान भरपाई पूर्ण मिळाली १२५६७ रु हे लुबाडणुक नाही का? शेतकयाच रक्त पेणारी विमा कंपन्या आहे या सरकार च्या काही नेता चे पाठबळ आहे हे निश्चीत

  Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये