खरीप पीकविमा 2021 साठी 973 कोटी निधिचा GR आला | Kharip Pikvima 2021

नमस्कार मित्रांनो आज खरीप पिक विमा २०२१ चा एक छोटासा अपडेट आला आहे. शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाचा GR आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 973 कोटी निधिचा GR आला आहे. राज्य शासनातर्फे पिक विमा कंपनीस निधि मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२१ साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. ९७३,१६,४७,७५८/इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

प्रस्तावना :

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षाकरीता दि.२९.०६.२०२० व दि. १७.०७.२०२० च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत उपरोक्त ६ कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील “चालु हंगामातील नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरीदेखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीम स्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकुण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५० टक्के रक्कम आगाऊ स्वरुपात कंपन्यांना द्यावी” असे नमूद आहे. त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने  पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून रु. ९७३,१६,४७,७५८/- इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

शासन निर्णय :

भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी रु. ९७३,१६,४७,७५८/- इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम २०२१ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

6 thoughts on “खरीप पीकविमा 2021 साठी 973 कोटी निधिचा GR आला | Kharip Pikvima 2021”

  1. काही पण अफवा पसरवु नका ,हा जी.आर.शेतकऱ्यांना पीक विमा मंजुर केल्याचा नसुन राज्य शासनाने विमा कंपन्यांना शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा केल्याचा आहे.विमा कंपनी शेतकऱ्यास किती नुकसान भरपाई देईल ,देईल की नाही देणार याची काहीच शाश्वत नाही, राज्य व केंद्र सरकारने विमा कंपन्यांना एवढ्या मोठ्या रकमा देऊन विमा कंपन्या जगविल्या पेक्षा ही रक्कम सरळ शेतकऱ्यांना अदा करावी

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये