महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कृषीमित्राची नियुक्ती होणार | कृषी मित्र योजना 2021 | शासन देणार अनुदान

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्याबाबत

हे पण वाचा :तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे आला पहा मोबाइलला वर

प्रस्तावना :

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणांवर कर्ज पुरवठा केला जातो. यामध्ये ही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो. हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम ही संपून जातो. केवळ कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी त्यास वेळेवर कर्ज मिळत कर्ज मिळत नाही. नाईलाजास्तव त्याला खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

योजनेचा उद्देश :

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास साधणे.

योजनेचे स्वरूप :

दरवर्षी खरीप, रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही. अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत स्वयंसेवकाची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेउन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

कृषी कर्ज मित्र नोंदणी Krushi Karj Mitra Yojana Online Registration :

अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

ब) नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.

क) जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.

कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल. कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.

77 thoughts on “महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कृषीमित्राची नियुक्ती होणार | कृषी मित्र योजना 2021 | शासन देणार अनुदान”

    • शासनाचा उद्देश चांगला असुन शेतकरी हीताचा आहे
      या साठी शासन कृषी कर्ज मीत्र या साठी जिल्हा परिषद मार्फत कृषी मीत्राची नेमनुक करणार आहे
      मी ता.जालना येथील रहिवासी असून मी अश्याच कार्या साठी जालना पंचायत समिती मार्फत स्वच्छता अभियान अंतर्गत. व सामाजिक आकेंक्षण सचंलनालय . महाराष्ट्र . साधन व्यक्ती व.कृषी विज्ञान केंद्र जालना शेतकरी हिताचे प्रशिक्षण घेतल आहे आतासुद्धा माझी कृषी कर्ज मीत्र म्हणून काम करण्यासाठी ईच्छा आहे

      Reply
    • आम्हीला गरज आहे कुर्षी मित्र होण्याची

      Reply
  1. मी कृषी मित्र बनून शेतकऱ्यांची मदत करायला निस्वार्थ पणे तयार आहे.

    Reply
  2. Hi yojana chhan asun shetkaryana हेलपाटे मारायला लागणार नाही

    Reply
  3. मी बाळासाहेब भागूजी थोरात मु.पोस्ट-खोडद,तालुका-जुन्नर,जिल्हा-पुणे. मी इच्छुक आहे कृषिमित्र होण्यासाठी .

    Reply
    • मला गरज hahe कृषी मित्र होण्याची अट uahid post falegaon tal kalyan dist thane

      Reply
    • कृषी मित्र होतास इच्छुक आहे

      Reply
  4. My Name is Rahul Ashok Thakane At vasantnagar bori gosavi post wadhagaon gadhawe
    Taluka-Yavatmal
    Dist- yavatmal
    Pin 445001
    Education Agree Diploma

    Reply
  5. मी इच्छुक आहे कृषी मित्र व्हायला

    Reply
  6. माझे नाव कूनाल जायसवाल मूकाम पोस्ट झडशी,ता. सेलू,जि.वर्धा.मला यात काम करायचे आहे काय करावे लागेल 7498003119 हा माझा नंबर आहे

    Reply
  7. मि, प्रमेश वेलादी मु,मंगुठा पो,बुगी तह, एटापल्ली व गडचिरल्ली महा,काम कारणार सर MO,9404129246

    Reply
  8. कृषी मित्र होण्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करावा कोणती site आहे सांगा

    Reply
  9. मी इच्छूक आहे कृषी मित्र होण्यासाठी
    रा. भिवपुर पो आव्हाना ता भोकरदन
    जि. जालना

    Reply
  10. मी सुशील कुमार साळवे रा रास्तळ जाफराबाद जि.जालना
    मी या कृषी मित्र होण्यास इच्छुक आहेत.
    मो नंबर.9823376536

    Reply
  11. मी सुशील कुमार साळवे रा रास्तळ जाफराबाद जि.जालना .
    मी या कृषी मित्र होण्यास इच्छुक आहेत.
    मो नंबर.9823376536

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये