राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 14 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि याच्यामध्येच मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत आणि याच्यामध्ये जातात कोणत्या पक्षाचा जाहीरनामा काय असेल वचननामा काय असेल मतदारांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी काय काय नेमका घोषणा केल्या जातील काय काय घोषणा दिले जातील याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिलेले.
अशा मध्ये जाता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांच्या माध्यमातून आपले वचनामे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून महिला युवक रोजगार आणि याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अशा घोषणा केलेले आहेत. ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या जाहीरनाम्यामध्ये शेती पिकाला अनुदान देणं लॉजिस्टर पार्ट च्या निर्मितीमध्ये वाढ करणे अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 45 हजार पान रस्त्याच्या निर्मिती शेतकऱ्यांचे कर्ज माफ याचबरोबर शेतकऱ्यांच्या एमएसपी वरती 20% अनुदान देण्याची या ठिकाणी या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे दान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान देण्यासाठीची देखील याच्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे वीज बिलामध्ये 30 टक्के कपात सोलर आणि अक्षय ऊर्जाला प्राधान्य व्रत पेन्शन धारकांची पेन्शन पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणे दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देणे 25 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अशा प्रकारचे काही या जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
याचबरोबर राज्यात राबवली जाणारे एक महत्त्वाचे अशी योजना म्हणजे लाडके बहिणी योजना या योजनेमध्ये पंधराशे ऐवजी 21 रुपयाचा मानधन महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलावर मध्ये समावेश याचबरोबर जिल्ह्यामध्ये आधुनिक कॅन्सर सेंटर उभारण्यासाठीचे देखील या जाहीरनामामधून घोषणा करण्यात आलेली आहे.
मित्रांनो याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा जाहीरनामा वचननामा प्रकाशित करण्यात आलेला आहे तो म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून याच्यामध्ये देखील लाडके बहीण योजनेमध्ये दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 25000 महिलांची पोलीस भरती शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर शेतकरी सन्मान निधी योजना मधून वर्षाला 12 हजाराच्या ऐवजी पंधरा हजार रुपयांचा मानधन राज्यातील प्रत्येक गरिबाला अन्न व निवारा अर्थात घरकुलाची योजना याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना पंधराशेच्या ऐवजी 2100 मानधन जीवाणूवाश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवणं 25 लाख रोजगार निर्मिती त्याचप्रमाणे दहा हजार विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा विद्यावेतन 45000 गावात पानंद रस्ते अंगणवाडी व अशा सेविकांना पंधरा हजार रुपये तसेच सुरक्षा कवच आणि वीज बिलामध्ये 30 टक्के कपात करून सौर उर्जेवरती भर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या घोषणा या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत.
मित्रांनो एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातून जरी जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले असले तरी एकंदरीत दोन्ही जाहीरनाम्यामध्ये एक साधर्म्य आहे आणि एकंदरीत हा महायुतीचा वचननामा म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो लवकरच काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या माध्यमातून याचबरोबर उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या माध्यमातून देखील आपले जाहीरनामे वचनामे प्रसिद्ध केले जातील आणि याच्यामधून देखील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काय घोषणा केल्या जातात हे देखील पाहण्यासारखे असेल या वचना मी संदर्भातील माहिती आल्यानंतर त्याबद्दल सुद्धा पण नक्की माहिती घेऊया धन्यवाद