फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 असा भरा ऑनलाइन फॉर्म | Mahajyoti Free Tablet Yojana Registration

Free Tablet Scheme Maharashtra 2023: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी MH- CETI/JEE/NEET २०२३ या परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट योजना आपल्या राज्यात महाज्योतीकडून राबवली जात आहे. या योजनेसाठी OBC, VJNT, SBC या प्रवर्गाांमधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. सन २०२३ मध्ये होणाऱ्या MH-CET/JEE/NEET परीक्ष्यांसाठी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून सन 2023 मध्ये राज्यातील ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्याथ्र्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. दहावी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते.

येथे क्लीक करून अर्ज करा 

आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं त्यांना शक्य होत नाही. अश्या गरीब विद्याथ्र्यांचेइंजिनीरिंग आणि मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.  फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 पात्रता (Eligibility) 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. (2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.” 3) जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या
विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी. 4) जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे. फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1) 9 वी ची गुणपत्रिका
(2) 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
(3) आधार कार्ड
4) रहिवासी दाखला
(5) जातीचे प्रमाणपत्र
(6) वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
अर्ज करण्याचा अंतिम दि.31/03/2023 आहे.

Leave a Comment