आज 12 वी चा निकाल जाहीर होणार 8 जून | 2022 Maharashtra HSC Result 2022 Live | असा पहा निकाल मोबाईलवर

Maharashtra HSC Result 2022 Live: MSBSHSE will announce HSC or Class 12 result on June 8, 2022 at 1 pm : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. www.mahresult.nic.in
  2. www.hscresult.mkcl.org
  3. https://hsc.mahresults.org.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास

स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते सोमवार, दिनांक २०/०६/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते बुधवार, दिनांक २९/०६/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.

Leave a Comment