महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ही महाराष्ट्र किसान योजना म्हणूनही ओळखली जाते. राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधीच वर्षाला ६,००० रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून ६ हजार आणि राज्य सरकार कडून ६ हजार आणि वर्षाला १२ हजार रुपये मिळू शकणार आहेत.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आणणार किसान योजना, शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रुपये
मुख्यमंत्री किसान योजना 2022:
राज्यातील अस्मानी संकटा मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार आहे. केंद्रातील प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली. याच धर्तीवर शिंदे सरकारने मुख्यमंत्री किसान योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागाच्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभाग स्तरावर नियोजनाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी येत्या आर्थिक वर्षात अर्थ संकल्पात तरतूद केली जाणार असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री किसान योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.
दरम्यान राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत वितरित केली जाईल.
मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेली मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिरायती शेतीसाठी पूर्वीचे दर हेक्टरी ६,८०० वरून १३ हजार ६०० रुपये, फळबागांसाठी १३ हजार ५०० रुपयांवरून २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बारमाही शेतीसाठी १८ हजारांवरून ३६ हजार रुपये करण्यात आले. हजार रुपये करण्यात आले आहेत. जिरायती, बागायती आणि बारमाही पिकांच्या बाबतीत पूर्वीची दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र किसान योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- मुख्यमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
- या आर्थिक मदती मुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांनाही मोठी मदत मिळणार आहे.
- ही योजना पीएम किसान सन्मान निधीशी जोडली गेली आहे. जेणेकरून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करता येईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना अर्ज प्रक्रिया
या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या फक्त महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मसुदा सरकार तयार करणार आहे. त्यानंतर सरकार ही योजना सुरू करण्याची घोषणा करेल. सरकार ही योजना कधी जाहीर करेल, त्यासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया, शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज कसा करू शकतात, हेही सांगेल. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकार जाहीर करेपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेतील अर्ज आणि इतर सर्व अपडेट्सशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला या लेखाशी जोडलेले राहण्याची विनंती आहे.
दरम्यान योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी काय अटी असणार हे स्पष्ट नाही. शिवाय केंद्र सरकारने लावलेल्या अटी मुख्यमंत्री किसना योजनेला लागू होणार का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. यामध्ये अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी विभागीय पातळीवर कामही सुरु झाले आहे.