कृषी पंप ग्राहक लाभार्थ्यांना मिळणार विजबिलात मोठी सवलत | 96 कोटी निधी मंजूर | शासन निर्णय 2021

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातीच्या कृषी पंप ग्राहक लाभार्थ्यांना वीज दरात सवलतीसाठी सन २०२१-२२ मध्ये अनुदान वितरण

प्रस्तावना:

राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते. यापुढेही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातीच्या संबंधीत कृषीपंपधारक या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने सन २०२१-२२ करिता महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रु. १९२.८६ कोटी इतकी तरतूद केली आहे.  सदर तरतूदीपैकी वित्त विभागाच्या मधील सूचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने रू. ९६.४३ कोटी इतकी तरतूद अन्वये महावितरण कंपनीस वितरीत करण्यासाठी प्रशासकीय विभाग म्हणून ऊर्जा विभागास उपलब्ध करून दिली आहे. सदर तरतूद रू. ९६,४३,००,०००/- (रूपये शहाण्णव कोटी त्रेचाळीस लाख फक्त) महावितरण कंपनीस वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

 

शासन निर्णय
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचीत जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचीत जाती तथा नवबौध्द या वैयक्तिक लाभार्थ्यांना कृषीपंपधारकांना वीज दरात सवलत देण्यासाठी रू. ९६,४३,००,०००/- (रूपये शहाण्णव कोटी त्रेचाळीस लाख फक्त) महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे.
  • या निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या निधीची रक्कम फक्त अनुसूचीत जाती तथा नवबौध्द लाभार्थ्यांवरच वीज दरात सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा-५ ने तसेच महावितरण कंपनीने घ्यावी. तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील.
  • वरील बाबींचा खर्च मागणी क्र.एन-३, २८०१, वीज, उप मुख्यलेखाशिर्ष-०५ पारेषण व वितरण, गौणशिर्ष ७८९ अनुसूचीत जाती घटक योजना, गट शिर्ष (०१) अनुसूचीत जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना उप गट शिर्ष (०१) (०२) कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत (कार्यक्रम) योजना सांकेतांक (२८०१५६६१) ३३, अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ करिता मंजूर अनुदानातून खर्ची टाकण्यात यावा.
  • सदरची रक्कम अधिदान व लेखा अधिकारी यांच्या मार्फत कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई यांना अदा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अवर सचिव (ऊर्जा-३) व नियंत्रण अधिकारी म्हणून सह सचिव (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर मंजूर झालेली रक्कम रू. ९६,४३,००,०००/- (रूपये शहाण्णव कोटी त्रेचाळीस लाख फक्त) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई येथून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या नावे स्वतंत्ररित्या धनादेश काढून वितरित अथवा NEFT/RTGS Fund Transfer द्वारे निधी हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करावी.

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये