MPSC Online 673 जागांसाठी अर्ज सुरू अर्जाचीशेवटची तारीख

MPSC Online 2023 जिल्हा परिषद अंतर्गत गट क श्रेणीतील नोकऱ्यांच्या भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारने एकूण रिक्त पदांपैकी 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालक आणि गट ड श्रेणीतील पदे वगळता इतर पदे भरण्यास राज्य सरकारने आज मान्यता दिली आहे. गट क श्रेणीसाठी ही भरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत केली जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकऱ्यांची भरती करण्यात येत असून ग्रामविकास विभागाची ही नोकऱ्या भरती महत्त्वाची मानली जात आहे.

या पदांची होणार भरती

येथे क्लिक करून पहा

MPSC Online 2023 मध्ये गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात नोकरभरतीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याअंतर्गत गट क आणि गट ड संवर्गासाठी ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ज्या विभागांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये सुधारित रचना अंतिम करण्यात आली आहे तेथे थेट सेवा कोट्यातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ज्या विभागांमध्ये सुधारित रचना अद्याप निश्चित झालेली नाही, त्या विभागांमध्ये गट अ, गट ब आणि गट क (चालक आणि गट ड संवर्गाची पदे वगळून) रिक्त पदांना थेट सेवा कोट्याच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत परवानगी दिली जात आहे. रिक्त पदे राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या २ लाख ४४ हजार ४०५ जागा रिक्त आहेत. एकूण पदांपैकी २३ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने 75 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर MPSC Online 2023 मध्ये कोणत्या विभागात किती कर्मचाऱ्यांची भरती होणे अपेक्षित आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये