मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि जमा होणार 80% अनुदान | Mukhymantri shaswat Krushi sinchan Yojana

Mukhymantri shaswat Krushi sinchan Yojana :-  नमस्ते शेतकरी मित्रांनो राज्या मधील शेतकरी बांधवां करिता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण प्रवण क्षेत्र तसेच Mukhymantri shaswat Krushi sinchan Yojna जिल्ह्या मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 साला च्या शासन निर्णया प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन

मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ही योजना राज्या मधील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी च्या शासन निर्णया मध्ये घेण्यात आले होते त्याच अनुषंगाने.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत लाभ

मित्रांनो राज्या मधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्यात येत आहे. सदरचा अनुज्ञेय अनुदाना  “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन”योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 80% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन 2022-23 निधी

मित्रांनो सन 2022 – 23 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकासाठी रुपये 84 कोटी आयुक्त (कृषी) यांना वितरित करण्याची बाब शासना च्या विचाराधीन होती. आणि त्याच नुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेऊन निधी वितरित करण्या करिता शासन निर्णय घेतलेला आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 – 23

सन 2022-23 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री शाश्वत (कृषी) सिंचन योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरिता रुपये 84 कोटी (रुपये चौऱ्याऐंशी कोटी फक्त) निधी आयुक्त कृषी यांना अर्थ संकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात परवानगी देण्यात आली आहे. आणि ही निधी पात्र लाभार्थ्यां च्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे.

मित्रांनो जे शेतकरी बांधव तुषार व ठिबक सिंचन योजने ची वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये