गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा
मित्रांनो आज आपण या लेखामद्धे गोदाम बांधकाम योजना च्या अंतर्गत शासकीय अनुदान मिळते त्याच प्रमाणे यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्या मध्ये कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य च्या अंतर्गत शेतकरी बांधव गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज सादर करू शकतात.
गोदाम बांधकाम योजना
अत्यंत शेतकरी असे आहेत कि ज्यांना आपल्या शेता मधील पिकांची मळणी करून ते पिक गोडावून मध्ये साठवून योग्य वेळी बाजारामध्ये आणण्याची इच्छा असते. फक्त पिक साठवणुकीसाठी गोडावून म्हणजेच कि गोदाम नसल्यामुळे ते पिक साठवू शकत नाहीत त्याच प्रमाणे योग्य वेळी मार्केटमध्ये नेऊ शकत नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी हि योजना खूप फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांच्या शेता मधील पिकांची व्यवस्थित साठवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन गोदाम बांधकामासाठी अनुदान देत असते. पण इतर शेतकरी बांधवाना गोदाम अनुदान योजना बद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल त्याच प्रमाणे शेता मधील पिक साठवणुकीसाठी गोदाम बांधू इच्छित असाल तर नक्कीच हि योजना तुमच्या कामाची ठरणार आहे.
अशी आहे गोदाम बांधकाम योजना
- गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज करून शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी बंधुंनो गोदाम हि आहे तरी कशी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
- तालुक्या मधील कृषी अधिकारी यांच्याकडे करावा लागणार अर्ज.
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजना अंतर्गत मिळणार लाभ.
- जास्तीत जास्त २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी मिळणार अनुदान.
- प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा साडेबारा लाख रुपये यापैकी जे कमी असेल तितके मिळणार शासकीय अनुदान.
- शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीकडून मागविले जात आहे अर्ज.
- वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करणे महत्वाचे आहे.
- अधिक माहिती साठी खालील दिलेल्या ऑफिसियल वेबसाईट वरती क्लिक करा