पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी

जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. मदतीची रक्कम प्रदान करताना संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील.


महसूल व वन विभाग जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत : शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

2. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यक्तीरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखली खर्च करण्यात यावी.

3. वरील मदतीच्या बाबी व निकषा व्यतिरिक्त इतर बाबींच्या नुकसानीसाठी  येथील शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व मदतीचे दर लागू राहतील.

4. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केलयानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये.

 

10 thoughts on “पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी”

  1. पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्याचा खुप नुकसान झाल आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये