नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो पण आता शासनाने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे पिक विमा प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रुपये मिळालाच पाहिजे असा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी शासनाने जारी केलेल्या आहे. जीआर का आहे तो आज आपण पाहणार आहोत ही खूप चांगली आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आणि तो कमीत कमी एक हजार रुपये असेल.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” या योजनेअंतर्गत रु.८,५३,०८,६१२/इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.
प्रस्तावना :
प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणीत होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.१०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात ) अन्वये निर्णय घेण्यात आला असून परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत. कृषि आयुक्तालयाच्या च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रबी २०१८-१९, खरिप २०१९, रबी २०१९-२० व खरीप हंगाम २०२० करीता रु.८,५२,०५,२४०/- इतकी रक्कम तसेच पत्रान्वये मागणी केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग २०१८, आंबिया २०१८-१९, मृग २०१९ , आंबिया २०१९-२० करीता १,०३,३७२/इतकी रक्कम अशी एकूण रु. ८,५३,०८,६१२/- इतकी रक्कम “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेसाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृषि आयुक्तालयाने प्रस्तावित केल्यानुसार एकूण रु. ८,५३,०८,६१२/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त रकमेपैकी प्रधानमंत्री पीक विमा योजना रबी २०१८-१९, खरिप २०१९, रबी २०१९-२० व खरीप हंगाम २०२० करीता रु. ८,५२,०५,२४०/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे