PM Kisaan Yojana पि एम किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील तर आता मिळणार फक्त आपल्या अकाउंट वर करा ही दुरुस्ती

नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांची यादी जाहीर झाली आहे. पीएम किसान सम्मान निधि चा नुकताच 8 वा हफ्ता दिला गेला आहे पण अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. तर त्यांची यादी आता आपल्याला पाहता येते अगदी सोप्या पद्धतीने.

 

जर आपल्याला आजपर्यंत एकही हफ्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका. यादीमध्ये आपले नाव बघा. आणि त्यासमोर असलेल्या त्रुटी दुरुस्त करा. आणि आतापर्यंतचे सर्व हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंट ला येऊन जातील. यादी मध्ये आपले नाव कसे तपासावे ते आता आपण बघुया.

यासाठी तुम्हाला पिएम किसान योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागणार. किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

Link: https://pmkisan.gov.in/gisdashboard/villagelevel.aspx

वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका ,आणि तुमच्या गाव, सिलेक्ट करायचे आहे. यानंतर शो वर क्लिक करायचा आहे.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला Payment Status पेमेंट स्टेटस या ऑप्शन वर क्लीक करायचं आहे. यानंतर Received No Payment रिसीव्ह नो पेमेंट वर क्लीक करायचे आहे.

आणि यादीत जर तुमचे नाव असेल तर तुमच्या नावापुढे तुमच्या अर्जामध्ये किंवा तुमच्या अकाउंट मध्ये काय त्रुटी आहे  ते लिहिलेलं असणार ही त्रुटी दूर करा आणि पुढच्या हप्त्याला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील.

Leave a Comment