नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हफ्त्याचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही हे पैसे कधी मिळणार आणि हे पैसे तुम्हाला मिळणार की नाहीत हे या पोस्टमध्ये आज आपण बघणार आहोत.
जर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर सरकार तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यात सरकार सहा हजार रुपयाची मदत करते. तुमच्या आठव्या हफ्त्याचे पैसे तुम्हाला लवकरच मिळतील या योजनेतून सुमारे आतापर्यंत साडेनऊ कोटी शेतकरी या योजनेचे जोडले गेलेले आहेत.
यावर्षीचा पहिला हप्ता चे पैसे एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. माहितीनुसार आठव्या त्याचे पैसे 14 मेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाऊ शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेले नाही. परंतु तुम्हाला आठव्या हफ्त्याचे पैसे मिळतील का नाही ते तुम्ही तुमच्या अकाउंट स्टेटस वर जाऊन चेक करू शकता. जर तुमच्या अकाउंट स्टेटस मध्ये FTO is generated and payment confirmation is pending असे लिहिले गेलेले असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होईल. आपला स्टेटस कसा बघावं ते आता आपण बघुया.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi पंतप्रधान किसान संमान निधीचा (PM Kisan Yojana List) या योजने अंतर्गत आपल्याला आता पर्यंत किती हफ्त्यांचे पैसे मिळाले आणि किती हफ्त्यांचे पैसे मिळाले नाहीत हे चेक करणे अगदी सोपे आहे. ते कसे चेक करायचे तेच आपण पाहणार आहो.
आपले खाते या प्रमाणे पहा:
- सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. वेबसाईट लिंक
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.
- येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
- नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांका पैकी कोणत्याही एका क्रमांकाने आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.
- आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.
- आपल्याला आठव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
- जर तुम्हाला ‘FTO is generated and Payment confirmation is pending’ असे दिसले तर याचा अर्थ असा आहे की निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा हप्ता काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.