PM Kisan या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत आठव्या किस्ती चे पैसे यादीमध्ये आपले नाव चेक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आठवी किस्ती चे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. पण असेही काही लोक आहेत की ज्यांना हे पैसे मिळणार नाहीत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सरकार योग्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षातून तीन वेळा 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये जमा करत असते.

सरकारची जी पहिली किस्त असते ती 1 एप्रिल ते 31 जुलाई पर्यंत असते. दुसरी किस्त 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत असते आणि तिसरी किस्त एक डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान मिळत असते. अशा मध्ये सरकारने पहिले किस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात केली. आहे तुमच्या खात्यामध्ये ही लवकरात लवकर पैसे येण्यास सुरुवात होईल. पण आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : PM किसान योजना: तुमच्या खात्यात पैसे आले कि नाही असे करा चेक मोबाईलवरच

यामध्ये काही लोकांना पैसे मिळणार नाही तर ते कोण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. जर जमीन आपल्या वडिलांच्या किंवा वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर असेल तर तो लाभ आपल्याला मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन आपल्या नावावर पाहिजे. यानंतर जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर, तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. तसेच जर तुम्ही डॉक्टर वकील किंवा कुठल्या नोकरी वर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

८ व्या किस्तीचे पैसे मिळण्याच्या यादीमध्ये आपले आहे कि नाही चेक करा

या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

किंवा https://pmkisan.gov.in/ पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करू शकता यावर  गेल्यावर तुम्हाला तुमचा राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा ब्लॉक, तुमचा तालुका, तुमचे गाव आणि गेट रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

आणि तुमच्या समोर या योजनेअंतर्गत तुमच्या गावांमधील पात्र लाभार्थी सर्वांचे यादी आहे ते तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार, यामध्ये आपण आपले नाव चेक करू शकता.

यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

 

 

4 thoughts on “PM Kisan या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत आठव्या किस्ती चे पैसे यादीमध्ये आपले नाव चेक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये