Pocra yojana 2023

पोक्रा डीबीटी: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत, विहिरी आणि बोअरवेल भरण्यासाठी रु. 14,222 ते रु. 16,000 पर्यंतचे अनुदान दिले जाईल. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती.

जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा बोअरवेल पुनर्भरण यांसारखे व्यवहार्य पर्याय आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील काही भागांना नेहमीच टंचाईचा सामना करावा लागतो. अशा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी जमिनीचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यामुळेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा म्हणजेच पोखरा योजनेचा लाभ गावातील शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना २६ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी

येथे क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना म्हणजेच पोखरा योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना विहिरी आणि बोअरवेल भरण्यासाठी 1422 ते 16 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील गट सहाय्यक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये