महाराष्ट्रामध्ये हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विभाग विदर्भ व मराठवाड्या मधील 4210 गावे त्याचबरोबर विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता येथील शासन निर्णयांन्वये सन 2021-22 मध्ये एकूण रु.452.43 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आली असून सदर निधी खर्ची पडलेला आहे. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी, शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषि संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टकरिता बाहय हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.250 कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. सबब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सदर रु.250 कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय :
- सन 2021-22 करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता 33-अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता रु.250 कोटी (रु.दोनशे पन्नास कोटी फक्त) निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाहय हिश्श्याचा रु. 210 कोटी (रु.दोनशे दहा कोटी फक्त) व राज्य हिश्श्याचा रु. 40 कोटी (रुपये चाळीस कोटी फक्त) निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.
- या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या रु.250 कोटी (रु.दोनशे पन्नास कोटी फक्त) निधीचे कोषागारातून आहरण व वितरणाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
- प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी 33-अर्थसहाय्य या उद्दिष्टशीर्षाखाली खर्च झालेल्या रक्कमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.
- प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.
- प्रकल्प संचालकांनी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.
- वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं क्र. 2021/प्र.क्र. 78 /अर्थ-3, दिनांक 20.07.2021 नुसार विहित केलेल्या अटींची पूर्तता होत असल्याने सदर परिपत्रकानुसार तसेच, नियोजन विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.267/2021/व्यय-1, दिनांक 30.08.2021 अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202109081450331501 असा आहे.
Abedkar chok shahada keriya rod shahada
News
Good best all
S.
Sp.bhange at khambala post mugat tq Mudkhed dist Nanded. Ms.
Kishan gabhale