प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” या योजनेअंतर्गत रु.६,९८,६१,८६९/- इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणीत होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.१०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्र. (१) अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्र. (२) च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत. कृषि आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. (५) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२१ करीता रु.६,९८,६१,८६९/- इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेअंतर्गत आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्र.५ येथील दि.०७.११.२०२२ च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२१ करिता रु.६,९८,६१,८६९/- इतकी रक्कम वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.