जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य च्या निवडणुकी नुकत्याच पार पडलेल्या आहे. ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांची नेमणूक झालेली आहे. याबाबत खूपच उत्सुकता आहे की सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळते व सदस्यांना काय मिळणार.
त्याचीच माहिती आपण या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत, तरी हि पोस्ट सूरवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावी.
मित्रांनो या पूर्वी फक्त सरपंचांनाच मानधन मिळत असायचे. उपसरपंच त्यांना काहीच मिळत नसायचे. आणि तेही मानधन फक्त एक हजार किंवा जास्तीत जास्त झाला तर दोन हजार रुपये असे मिळायचे. पण नवीन झालेल्या राज्य सरकारच्या 30 जुलै 2019 च्या निर्णयानुसार सरपंच यांच्या मानधनात वाढ होऊन ती वाढत तीन पट केलेली आहे.
यात उपसरपंचांनाही मानधन देण्याचे जाहीर केले आहे. तर हे जे मानधन आहे हे गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. तर ती गावाची लोकसंख्या किती आहे त्यानुसार त्यांना किती मानधन मिळते ते आता आपण बघुया.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना ग्रामनिधीतून मानधन देण्यात येणार आहे. मिळणाऱ्या मानधनातून 75 टक्के रक्कम शासन निधीतून मिळणार आहे व 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून दिली जाणार आहे. आणि जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते मात्र केवळ दोनशे ते तीनशे रुपये बैठक भत्ता आणि चहापाणी एवढ्यावर समाधान मानावे लागणार आहे.
अश्या प्रकारे मानधन लोकसंख्यानिहाय ग्रामपंचायती सरपंचांना- उपसरपंचांना मिळणारे मानधन
० ते २००० लोकसंख्या: (सरपंच ) ३००० रुपये (उपसरपंच )१००० रुपये
२००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या: (सरपंच ) ४००० रुपये (उपसरपंच ) १५०० रुपये
८ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या: (सरपंच ) ५००० रुपये (उपसरपंच ) २००० रुपये