संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची इ-पास (E-Pass) आपल्या मोबाइल वर कशी काढावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो कोरोना मुळे लॉकडाऊन काळात सर्व मंदिर आणि धार्मिक स्थळ बंद होती. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व मंदिरे सुरू झाली. त्याचप्रमाणे शेगावचे संत श्री गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा सुरू झाले. पण त्यासाठी एक अत्याधुनिक सुविधा वापरण्यात आलेली आहे. ती म्हणजे E-Pass श्रींच्या दर्शनासाठी लागणारी E-Pass. ही पास असल्याशिवाय आपल्याला दर्शन करता येणार नाही. या लेखांमध्ये आपण ती पास कशी काढावी. याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तरी आपण हि पोस्ट पूर्णपणे वाचावी.

हे पण वाचा : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे आला पहा मोबाइलला वर

 

Step 1: सर्वप्रथम श्री गजानन महाराजांच्या वेबसाइटवर जावे. gajananmaharaj.org या वेबसाइटवर आपण जावे किंवा दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इंटर करावे लागेल. आणि Submit for Dharshan E-Pass वर क्लिक करावे.

Step 2: नंतर तुम्हाला

  • तारीख
  • दर्शनाची वेळ
  • मोबाईल नंबर
  • तुमची जन्मदिनांक
  • तुमचा ईमेल आयडी

हि सर्व माहिती सबमिट करावी लागणारआणि Submit for Dharshan E-Pass वर क्लिक करावे.

Step 3: त्यानंतर तुम्ही सबमिट केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP (One Time Password) येणार तो OTP या वेबसाईटवर तुम्हाला सबमिट करायचा आहे. आणि ओके बटन वर क्लिक करायचा आहे.

Step 4: यानंतरच्या वेबपेजवर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, राज्य, जिल्हा, तालुका, पिन कोड नंबर, आणि सध्याचा रहिवासी पत्ता, आणि त्याच सोबत स्वतःचे पासपोर्ट सारखे छायाचित्र व आधार कार्ड चे छायाचित्र जोडायचे आहे. यामध्ये तुम्हाला कॅमेरा द्वारे फोटो सुद्धा घेता येतो किंवा तुमच्या मोबाईल मध्ये आधीच असलेले फोटो सुद्धा अपलोड करता येतात.

ही सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर आपली E Pass जनरेट होणार. हि पास तुमच्या मोबाइल मद्धे PDF फॉरमॅट मद्धे सेव्ह होणार. अशा प्रकारे तुमची श्रींच्या दर्शनासाठी ची E Pass तयार होणार.

28 thoughts on “संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची इ-पास (E-Pass) आपल्या मोबाइल वर कशी काढावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया”

  1. type : Shegaon e darshan pass. Select first option “https://www.gajananmaharaj.org” and follow steps mentioned above. Keep ready photo of Aadhar, Photo of concerned person. The e pass is driven by Aadhar Card. You can log into the site with Aadhar Number and can take print, cancel e pass also. It is very much simple.

    Reply
  2. मला उद्या साठी पास पाहिजे मिळेल का जय गजानन महाराज

    Reply
  3. दर्शनासाठी 3 ते 10 वर्षापर्यंत प्रवेश आहे का? व त्यांचा ई पास लागेल का?

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये