मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना | ठिबक सिंचन साठी सरसकट ८०% अनुदान नवीन GR आला

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. subsidy-for-drip-irrigation

प्रस्तावना :

संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. drip subsidy application

शासन निर्णयः  संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून आता या शासन निर्णयान्वये राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांचा सदर योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.  सदर १०७ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची अंमलबजावणी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी, सदर तालुक्यांची यादी या शासन निर्णयासोबत सहपत्रित करण्यात येत आहे. mukhyamantri shaswat sinchan yojana 2021

 

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

9 thoughts on “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना | ठिबक सिंचन साठी सरसकट ८०% अनुदान नवीन GR आला”

  1. ठिबक सिंचन योजनेंतर्गत किती प्रकार ते कसे ते पुर्ण स्पष्ट सांगावे जसे -: 1)प्रधान मंत्री कुषी सिंचन योजना नतर
    2) पोखरा नतर
    3) मुख्यमंत्री शाश्वत कूषि सिंचन योजना
    समजायला मार्ग नाही महा डिबेटी मधे तिन्ही वेगळे.
    आनि कुषी विभाग मोठ्या डिलर ला सर्व सुट छोट्या चे मात्र खुप खुप आनी खुप हाल करतात यावर तोडगा निघेल का सरकार कडुन. कृषी मधली मडळी चागल्या करता खुप त्रासदायक आहेत याचा सरकार ने विचार करायलाच हवा.

    आपला देश भ्रष्टाचार मुक्त कधी शक्यच नाही

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये