Thibak Sinchan Yojana Maharashtra | पहा ठिबक, तुषार सिंचन 80% अनुदाना वरती किती मिळणार एकरी अनुदान ? व कसा करावा ऑनलाईन अर्ज?

Thibak Sinchan Anudan Maharashtra 2022 :- नमस्कार शेतकरी मित्रानो आज या मध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहो. या मध्ये शेतकरी बांधवा करिता केंद्र शासनाने तसेच राज्य शासना ने महत्त्वाची अशी योजना सुरू करण्यात आली आहे.

तसेच ती योजना म्हणजे ठिबक, तुषार सिंचन योजना या योजने च्या अंतर्गत शेतकरी बांधवाना 75 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. तर हे अनुदान हेक्टरी किती मिळणार आहे? एकरी किती मिळते. त्या करिता ऑनलाईन अर्ज कसा करावा, शासनाचा शासन निर्णय, आणि त्या बरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ही संपूर्ण माहिती या मध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या करिता संपूर्ण माहिती वाचा.

Thibak Sinchan Yojana Maharashtra

सर्व प्रथम जाणून घेऊया की ठिबक सिंचन, तुषार सिंचना करिता 80% अनुदान देण्यात येते. तर या मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने च्या अंतर्गत पूरक अनुदान हे दिल जात. तर या मध्ये 30% पूरक तसेच 25% पूरक असा अनुदान दिलं जाते. आणि याच अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने च्या अंतर्गत लाभार्थ्यां ना याआधी 45 आणि 55% असे अनुदान दिले जात होतं.

हे अनुदान आता वाढून 75 ते 80 टक्के करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि राज्या चे मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत लाभार्थ्यां ना 75% ते 80% अनुदानित दिले जाणार आहे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया.

ठिबक तुषार सिंचन योजना

चला तर जाणून घेऊया ठिबक सिंचन एक हेक्टर साठी लॅटरल अंतर मीटर मध्ये 1.2×0.6 खर्च मर्यादा या मध्ये 1 लाख 27 हजार 501 रुपये अनुदान 80% नुसार 1 लाख 20 हजार रुपये. अनुदान 75 टक्के नुसार 95 हजार 626 रुपये एवढा अनुदान आपल्याला मिळू शकते.

लॅटरल करिता 1.2×0.6. लॅटरल अंतर मीटर 1.5×1.5 करिता. खर्च मर्यादा 97,245 रुपये अनुदान 80% नुसार जवळपास 77 हजार 796 रुपय. अनुदान 75 टक्के नुसार 72 हजार 934 एवढा अनुदान मिळतं. लॅटरल अंतर मीटर मध्ये 5×5 करिता खर्च 39 हजार 378 रुपये अनुदान. 80 हजार नुसार 31,502 रुपये. तर अनुदान 75% नुसार 29,533 रुपये एवढा अनुदान मिळतं.

तुषार सिंचन योजना महाराष्ट्र

सिंचन क्षेत्रा साठी अनुदान हे पुढील नुसार आहे. 1 हेक्टर करिता तर या मध्ये खर्च मर्यादा 75 mm करिता 24 हजार 194 रुपये. तर 80 टक्के अनुदाना प्रमाणे 19 हजार 355 रुपये, 75 टक्के अनुदाना नुसार 18 हजार 145 रुपये. असा खर्च तुषार सिंचन 1 हेक्टरसाठी लागतो. तर त्यापैकी असे अनुदान आपल्याला मिळू शकते.

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये