महाराष्ट्रात उष्णतेची लाट महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील तापमान जे आहे ते दररोज वाढत चाललेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भाग आहेत तेथे आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. आणि यामुळे उष्ण वातावरण तयार झालेला आहे.

त्यासोबतच हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या भागांमध्ये कोकण या भागात समावेश होतो. मध्य महाराष्ट्राचा समावेश होतो त्या सह मराठवाडा या विभागात समावेश होतो. आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेले आहे तरीही हवामान खात्याने पावसाचा अंदाज येथे दाखवलेला आहे. हा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकाऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून वर्तविला आहे. आणि महाराष्ट्रात विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

1 thought on “महाराष्ट्रात उष्णतेची लाट महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये