modi awas gharkul yojana 2024 इतर मागास बहुजन कल्याण विभाग सन २०२३-२४ ते सन २०२५-२६ या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी आवास” घरकुल योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असून यापैकी ३ लाख घरांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३-२४ या पहिल्या वर्षात पुर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
“मोदी आवास” घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.
सदर निधी वितरित करण्यासाठी “मागणी क्र.झेडजी- ३, २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण, १०२, आर्थिक विकास, (०१), विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१) (१२) इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना (२२२५एफ७८२) (कार्यक्रम), ३१,
“मोदी आवास” घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.
सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशीर्षाखाली डिसेंबर २०२३ च्या अधिवेशनात १०००.०० कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार रु.३५० कोटी इतका निधी संदर्भाधिन क्र.८ नुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांना वितरीत करण्यात आला आहे.
आता, वित्त विभागाने २२२५एफ७८२ या लेखाशीर्षाखाली रु.३५० कोटी इतका निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. सदरचा निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांना वितरीत करण्यात येत आहे.
सदरचा निधी वितरीत करताना संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणुक आयोग यांच्या संदर्भाधिन दि.०७.०१.२००७ रोजीच्या पत्रात व कार्यालय मुख्य चुनाव अधिकारी, दिल्ली यांच्या दि.१६.०३.२०२४ रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहिताच्या अनुषंगाने नमुद अटी-शर्तीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.